गेल्या 50 वर्षांत जयमाला इनामदार यांनी गाढवाला भेटला गुरू, घाशिराम कोतवाल, सखा माझा मंत्री झाला, सौजन्याची ऐशी तैशी यांसारखी नाटके रंगभूमीवर तर उमंग, उंबरठा, बिनधास्त, दिशा, सुबह, सवत माझी लाडकी, वहिनीसाहेब, संथ वाहते कृष्णामाई, सख्या सजणा, देवा तुझी सोन्याची जेजूरी, सुरंगा म्हणत्यात मला, केला इशारा जाता जाता, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी असे चित्रपटही केले. याशिवाय रसिकप्रिय विच्छा माझी पुरी करा, आतून किर्तन वरून तमाशा, चोरीचा मामला, सखाराम हवालदार ते कथा अकलेच्या कांद्याची पर्यंत जवळपास 40 वगनाट्यातून प्रमुख नर्तिका, अभिनेत्री व चित्रपटांची नृत्य दिग्दर्शिका म्हणून कामे केली.

जयमाला इनामदार यांची नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी 'लोककला अकादमी' ही संस्था आहे. याच नृत्यकलेच्या जोरावर जयमाला यांनी ‘घाशिराम कोतवाल’ या नाटकाबरोबर एकदा तसेच व्हॅन शिप्ले आणि इन्याक ड्यानियल यांच्या आर्केस्ट्रा बरोबर तीन वेळा जर्मनी, फ्रान्स, लंडन, रोम येथे परदेश दौरे केले आहेत. 2008 साली ‘मी मराठी’ वाहीनी साठी ‘छुम छुम छननन!’ या मराठी लावण्यांवर आधारीत कार्यक्रमात सेलीब्रिटी परीक्षक म्हणून काम पाहीले. याच काळात ‘गांव तसं चांगलं’ या चित्रपटात भूमिका केली. 2009 मध्ये डी. के. प्रोडक्शन्स निर्मित ‘मारूतीच्या बेंबीत’ या नाटकात तसेच ‘नवदुर्गा’ या अल्बम मध्ये काम केले. तसेच ‘स्टार प्रवाह’ या वाहीनीवरील ‘अग्नीहोत्र’ या मालीकेत प्रमुख भूमिका केली आहे. तसेच 2010 या वर्षात केलेले तोडफोड, सतिचं मंदिर व शहरातली पोर गावात शिरजोर हे चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.


सन्मान आणि पुरस्कार :

  • गाढवाचं लग्न ह्या वगनाट्याने 2000 साली 2000 प्रयोग पूर्ण करून विश्वविक्रम केला त्या प्रीत्यर्थ कै.रामकृष्णाजी मोरे (संस्कृतिक मंत्री) ह्यांनी कै.प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार ह्यांना आहेर रुपी 1 लाख 11 हजार रुपये धनादेश देऊन गौरवण्यात आले.
  • तसेच गणेश दादू इंदुरीकर पुरस्कार - अमोलजी पालेकर यांच्या हस्ते (नाट्यपरिषद,पुणे)
  • श्री साई महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार (2011), लक्षवेधी विनोदी अभिनेत्री,
  • नाट्यदर्पण (लफडा सदन), आदर्श माता पुरस्कार,
  • बालगंधर्व पुरस्कार दीप्ती चौधरी यांच्या हस्ते (महानगरपालिका, पुणे)

अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

© प्रकाश इनामदार Developed By : Gurusparsha Multimedia